Skip to main content

Shekap

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो “जगातील डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा आयकॉन. जन्म अर्जेंटिनातला, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड मोटारसायकल वरून फिरणारा, क्युबन क्रांतीचा एक महत्त्वाचा नायक, त्यानंतर बोलिव्हियामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करणारा एक खराखुरा क्रांतिकारक. जगात जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे जाऊन लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे कॉम्रेड अर्नेस्टो चे गव्हेरा नक्कीच सर्व देशांच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवरील तमाम तरुणांचा आदर्श बनण्यावाचून कसा राहील. अर्नेस्टो चे गव्हेरा हे क्युबन क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे पुढारी, लढाऊ सेनापती, खुपच प्रभावी क्रांतिकारक होते. कारण ते जन्मले अर्जेंटिनामध्ये, क्रांतिकार्य केले क्युबात आणि तेच कार्य करताना शहीद झाले बोलिव्हियात. म्हणूनच तर ‘चे’ यांच्याबद्दल जागतिक पातळीवर एक वेगळेच आकर्षण आहे. १४ जून, १९२८ रोजी अर्जेंटिनामधील रोसरिओ येथे ‘चे’ यांचा जन्म झाला. ‘चे’ हे आपले वैद्यकीय शिक्षण सुरू असताना डिसेंबर १९५१ मध्ये अल्बर्टो या मित्रासोबत मोटारसायकलवरून दक्षिण अमेरिका खंड फिरायला गेले. चिली, पेरु, लटेशिया, कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, अर्जेंटिना या देशात फिरले. आगस्ट १९५२ मध्ये ‘चे’ परतले आणि जोरदार अभ्यास करून मार्च १९५३ मध्ये डॉक्टर बनले. त्यानंतर करकास येथील कुष्ठधाम ‘चे’ यांना ८०० डॉलर्स महिना पगारावर नोकरी द्यायला तयार होते. परंतु ‘चे’ यांनी तसे केले नाही. ‘चे’ यांनी शिक्षण घेतानाच मार्क्सवादी पुस्तके वाचली होती. दक्षिण अमेरिकेतील प्रवासात त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे भयानक दारिद्र्य व मागासलेपणा अगदी जवळून अनुभवले होते. या सर्व परिस्थितीला परदेशी मक्तेदार, अमेरिकन साम्राज्यवाद कारणीभूत आहे. हे त्यांना स्पष्ट झाले होते. गुलामीच्या बेड्या उखडून टाकण्यासाठी, साम्राज्यवादाला पराभूत करून पिचलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे केवळ क्रांती.’चे’ यांना हे स्पष्ट समजले होते. वंचितांना खरे जीवन मिळवून देणे, मानवी कल्याणासाठी कार्य करणे हे एक जगप्रसिद्ध संशोधक किंवा विख्यात डॉक्टर बनणे यापेक्षा किंचितही कमी नाही. याबद्दल ‘चे’ यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. शिक्षण संपल्यावर ‘चे’ यांनी काही दिवस बोलिव्हिया आणि ग्वाटेमाला देशात कार्य केले. हे कार्य सुरू असतानाच जून १९५५ मध्ये ‘चे’ यांची राउल कास्ट्रो यांच्याशी भेट झाली. याच दरम्यान फिडेल कास्ट्रो अमेरिकेत आपल्या क्युबन देशबांधवांकडून क्रांतिकार्यासाठी मदत जमा करीत होते. जुलै १९५५ मध्ये मेक्सिकोत फिडेल कास्ट्रो यांच्याशी ‘चे’ यांची भेट राउल कास्ट्रो यांनी करून दिली. त्यांच्यात आगामी योजनांची व राजकीय विषयांवर चर्चा झाली. मदत जमा केल्यानंतर नोव्हेंबर १९५६ मध्ये ‘ग्रान्मा’ने क्रांतिकारक क्युबाकडे रवाना झाले. त्या बोटीची क्षमता केवळ १२ होती, त्यात ८० पेक्षा अधिक माणसं बसली होती. बोटीला क्युबाच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. प्रवासात असताना अचानक बोटीत पाणी शिरले. क्रांतिकारकांना खूप कमी अन्नावर जगावे लागले. एकावेळी तर सडकी संत्री केवळ शिल्लक राहिली होती. त्याचवेळी ‘चे’ यांच्या दम्याच्या आजाराने जोर धरला होता. तरी देखील तशाही परिस्थितीत ‘चे’ क्रांतिकारकांमध्ये उत्साह वाढवित होते. बोट अचानकच किनाऱ्यापासून काही अंतरावरच थांबली. क्रांतिकारकांना पुरेशी हत्यारं आणि थोडेसे अन्न याशिवाय गळ्यापर्यंत पाण्यातून जाताना काही सोबत घेता आले नाही. ‘ग्रान्मा’ असताना हुकुमशाह बटिस्टाच्या विमानांनी तिला हेरले होते. पाण्यातून मार्ग काढताना क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू झाला. क्रांतिकारक विमानांना चुकवत पुढे सरकत होते. त्यादिवशी संपूर्ण रात्र क्रांतिकारकांना ऊसाच्या मळ्यातून चालावे लागले होते. ऊस खाऊन ते भूक मिटवत होते. एका कारखान्याच्या परिसरात क्रांतिकारक विश्रांती करतानाच त्यांच्यावर पुन्हा गोळीबार सुरू झाला. बराच वेळ चकमक उडाली. आडोसा घेण्यासाठी ‘चे’सह क्रांतिकारक ऊसाच्या मळ्यात शिरले. विमाने गेल्यानंतर क्रांतिकारक पुढे सरकले आणि मागे वळून पाहिले तर त्याच ऊसाच्या मळ्याला आगीने घेरले होते. त्यानंतर अनेक लढाया झाल्या. त्या प्रत्येक लढाईमध्ये ‘चे’ आघाडीवर असत. पहिल्याच लढाईत बटिस्टाच्या सैन्याचे क्रांतिकारकांनी पराभव केल्याने ते पार खचून गेले होते. क्युबातील सिएरा मिस्रा डोंगर परिसरात क्रांतिकारकांनी आपले तळ ठोकले होते. क्रांतिकारकांना गनिमी युद्ध व राजकीय शिक्षण देण्याची मुख्य जबाबदारी ‘चे’ यांच्याकडे होती. क्युबातील वेगवेगळ्या भागात असे ठिकाण क्रांतिकारकांनी बनवले होते. याचदरम्यान शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा पाठिंबा क्रांतिकारकांना मिळत होता. त्यांच्यातले काही जण प्रत्यक्ष लढ्यात सामील होत होते. जनतेने क्रांतिकारकांना अन्न पुरवूनही भरपूर मदत केली. १९५८ च्या आगस्टमध्ये फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा यांनी एक सार्वत्रिक योजना आखली. अर्थातच क्युबन कम्युनिस्ट पक्षही यामध्ये सामील होता. क्युबन जनता बटिस्टाच्या जुलुमाला प्रचंड कंटाळली होती. दडपशाही, भ्रष्टाचार, अराजक यांना पार कंटाळलेल्या जनतेमध्ये हुकुमशाह बटिस्टाविरोधी भयंकर चीड निर्माण झालेली होती. क्युबाला केवळ लुटण्याशिवाय बटिस्टाने काही केले नाही. अमेरिका हुकुमशाह बटिस्टाला पूर्ण सहकार्य करत होती. लढाईसाठी लागणारी सर्व हत्यारं, शस्त्रास्त्रे बटिस्टाकडे होती, परंतु ती कुशलपणे वापरणाऱ्यांचा अभाव होता. १९५८ आगस्टच्या शेवटी लढाईच्या सर्व सूचना क्रांतिकारकांना देण्यात आल्या. फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो व इतर नेत्यांच्या नेतृत्त्वात क्युबातील विविध भागात प्रत्यक्ष लढाई करायला क्रांतिकारक पूर्णपणे तयार होते. सर्व नियोजन झाल्यानंतर क्रांतिकारकांनी क्युबातील अनेक ठिकाणी लढाया करून त्या त्या भागावर ताबा मिळवला. लढाई जिंकत जिंकत क्रांतिकारक हवानाकडे जात होते. त्याचवेळी जनतेने बटिस्टा सरकारला कर भरणे बंद केले. कामगार संपावर गेले. फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो व इतर सर्वच क्रांतिकारकांचे जनता तुफानी स्वागत करत होती. त्यांचा जयजयकार करून क्रांतीला समर्थन दर्शवत होती. परिस्थिती क्रांतिकारकांसाठी अनुकूल बनत होती. काही ठिकाणी तर बटिस्टाचे सैन्य लढाई सुरू होण्याआधीच शरण आले. बरीच शहरे, गावं विविध ठिकाणी क्रांतिकारकांनी ताब्यात घेतले. क्रांतिकारकांनी बटिस्टाची हजारो सैन्य, मशीनगन्स, लढाऊ विमान, दारूगोळा आणि महत्त्वाचे अधिकारी कैद केले होते. आता जे अधिकारी आणि सैन्य बटिस्टाकडे होते, त्यांचा तर फिडेल कास्ट्रो आणि चे गव्हेरा यांचे फक्त नाव जरी ऐकले तरी थरकाप उडत होता. त्यामुळे शेवटी – शेवटी तर बटिस्टाच्या सैन्यात बटिस्टासाठी लढण्याची इच्छाच उरली नव्हती. १९५८ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी क्रांतिकारकांना अनेकदा संघर्ष करावा लागला. सर्व लढाया क्रांतिकारक जिंकत होते. क्रांतिकारकांना अंतिम विजय प्राप्त होण्याआधीच ३१ डिसेंबर १९५८ च्या रात्री हुकुमशाह बटिस्टा क्युबा सोडून पळून गेला. पराभव जवळच दिसल्याने त्याने आपले सामान गुंडाळले. ही बातमी वाऱ्यासारखी क्युबात पसरली. बटिस्टाचे उर्वरित अधिकारी आणि सैन्य यांना आता शरण पत्करल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता, झाले देखील तसेच. १९५९ च्या नववर्षाने क्युबन क्रांतीचे जंगी स्वागत झाले. क्रातीचे नेते फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो आणि त्यांचे सर्व क्रांतिकारक सहकारी यांचे सर्व जनतेने अभिनंदन केले. क्रांती यशस्वी झाली. क्रांतीनंतर फिडेल कास्ट्रो हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष बनले तर चे गव्हेरा यांच्याकडे संरक्षण, लष्कर, अर्थ, उद्योग ही खाती तसेच क्युबन राष्ट्रीय बँकेचे संचालक, आर्थिक सल्लागार, नियोजन मंडळ या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. चे गव्हेरा हे क्युबन कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळातही होते. क्रांती झाली तेंव्हा ‘चे’ यांचे वय केवळ ३० वर्षे तर फिडेल कास्ट्रो हे ३२ वर्षांचे तरूण होते. क्रांतीनंतरही ‘चे’ यांच्यात असलेली क्रांतिकारक ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. क्युबन क्रांतीने संपूर्ण दक्षिण अमेरिकेत एक नवचैतन्य निर्माण केले होते. १९६५ मध्ये ‘चे’ यांनी क्युबा सोडला. तेथून गेल्यावर सुरूवातीला कांगो देशात कार्य केले. त्यानंतर बोलिव्हियामध्ये अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने गेले. बोलिव्हियामध्ये ‘चे’

गडचिरोलीत २६ व २७ नोव्हेंबरला शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो गडचिरोलीत २६ व २७ नोव्हेंबरला शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक गडचिरोली,ता.२५: भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्य आ.भाई जयंत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी(ता.२५) आज जिल्ह्यात दाखल होत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक २६ व २७ नोव्हेंबरला गडचिरोली येथील बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील, आ. शामसुंदर शिंदे, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटने राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार संपतबापू पवार, माजी आमदार धैर्यशीलपाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, प्रा एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड.राजेंद्र कोरडे उपस्थित राहणार आहेत. शिवाय राज्यभरातील दीडशेहून अधिक प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत. आ.जयंत पाटील हे शुक्रवारी गडचिरोलीत दाखल झाल्यानंतर विविध ठिकाणी भेटी देणार असून, शेतकरी, मजूर, कामगार आणि विविध समुहांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. शिवाय ते जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्याची शक्यता असल्याची माहिती शेकापच्या राज्य मध्यवर्ती समितीचे सदस्य तथा जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली. Facebook X-twitter Telegram Whatsapp फोन क्रमांक ०२२ २२६१४१५३ ईमेल पत्ता info@skekap.com आमच्याशी संपर्क साधा

लोह खाणी तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो लोह खाणी तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा दिला इशारा गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूची अंतर्गत समाविष्ठ असलेला क्षेत्र असून या क्षेत्रात लागू असलेला पेसा कायद्याच्या तरतूदीचा भंग करुन बेकायदेशिरपणे प्रस्तावित व मंजूर केलेल्या लोह खाणी तातडीने रद्द करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करु. असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे. भारतीय खाण ब्युरोच्या महानियंत्रकांना पाठविलेल्या तक्रारीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील खाणींच्या विरोधात स्थानिक वैधानिक ग्रामसभांनी आणि आदिवासी जनतेने प्रखर आंदोलने, मोर्चे , निवेदने, ठराव केलेले असून वेळोवेळी शासनाला सादर केलेले आहेत.स्थानिकांच्या या वैधानिक आणि संविधानिक भूमिकेला आमच्या शेतकरी कामगार पक्षाने आणि आम्ही नेहमीच समर्थन दिले असून यासंबंधाने आम्ही वेळोवेळी पत्र, निवेदने, तकारी शासनाकडे सादर केलेले आहेत, हे शासनास माहित असूनही शासनाने सदर लोहखाणी कायमस्वरुपी रद्द न करता उलट बळजबरीने स्थानिकांना आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याना यूएपीए ॲक्ट, ११०, ३५३ यासारखे कलमे आणि कायद्याचा धाक दाखवून, पोलिस बळाचा वापर करुन सुरजागड सह विविध ठिकाणी लोह खाणी खोदण्याचे प्रयत्न करीत आहात. असा गंभीर आरोप भाई रामदास जराते यांनी केला आहे. सुरजागड येथील बळजबरीने खोदण्यात येत असलेल्या लोह खाणीच्या १० दशलक्ष टन प्रती वर्ष उत्खननाला नुकतीच दिलेली परवानगी ही बळजबरी आणि बेकायदेशिरपणाचा कळस गाठणारी बाब आहे. ग्रामसभांची नसलेली परवानगी, खाणी करीता हेडरी ते खाणकामापर्यंत मोठ्या झाडांचे जंगल कापून केलेला रस्ता, त्याकरीता वनविभागाने नोंदविलेला गुन्हा, ग्रामसभांना मिळालेले सामुहिक जंगलाच्या अधिकाराचा पट्टा, सध्या सुरु असलेल्या वाहतुकीमुळे होत असलेले अपघात, खाणीचा कॅपटिव्ह मायनिंगचा बदलविलेला दर्जा, राज्याच्या विधानसभा व विधानपरिषद सभागृहात अनेकदा सुरजागड लोह खाणी विरोधात झालेली चर्चा अशा अनेक बाबींकडे आपण सोईस्करपणे दुर्लक्ष करुन सुरजागड येथे मे. लॉयड्स मेटल ॲन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीला परवानग्या देण्याचे धाडस करुन पेसा, वनहक्क, जैविक विविधता, पर्यावरण, वनसंवर्धन, खाण व खनिज अधिनियमांचे उल्लंघन का करीत आहात, हे आम्हाला अजूनही कळलेले नाही.अशी खोचक टीकाही शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. लोह खाणींना ज्या क्षेत्रात आपण मंजूरी देत आहात तिथे भारतातील अत्यंत अतिअसूरक्षीत गणल्या जाणारी माडिया गोंड जमात आदिम काळापासून वास्तव्यास असून या आदिम जमातीचे वसतीस्थान आणि सांस्कृतिक अस्तित्व या बेकायदेशिरपणे खोदल्या जाणाऱ्या खाणींमुळे धोक्यात आले आहे. जागतिक पातळीवरील पर्यावरणाचा वाढता धोका लक्षात घेता आमच्या जिल्ह्यातील वनसंपदेच्या रक्षणासाठी आणि भारताच्या संविधानाने आदिवासी इलाख्यात शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी पाचव्या अनुसूची अंतर्गत केलेली तरतुदीच्या हक्क आणि अधिकारासाठी आम्ही सजग असून गडचिरोली जिल्ह्यात बळजरीने खोदल्या जाणाऱ्या खाणींकरीता आम्ही शासनाचा जाहिरपणे निषेध करीत असल्याचेही आपल्या पत्रात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे. तसेच सुरजागड येथे मे. लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड, मे. गोपानी आयर्न यांना मंजूर केलेल्या लोहखाणी तातडीने रद्द करण्यात याव्यात. सुरजागड पासून अंदाजे २० किलोमिटर अंतरावर नव्याने प्रस्तावित करुन जाहीर निविदेव्दारे नेचरल रिसोरसेस, युनिवर्सल सर्विसेस, ओम साईराम स्टील, जेएसडब्लू स्टील लिमिटेड, सनफ्लाग स्टील या कपन्यांकरीता सहा ठिकाणी लोहखाणी करीता लिज देण्याचे प्रयत्न करीत आहात, त्या सर्व सहाही लोहखाणी तातडीने रद्द करण्यात याव्यात. अशी प्रमुख मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय खाण सचिव, उप खाण नियंत्रक आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांनाही सदर पत्राची प्रत शेतकरी कामगार पक्षातर्फे पाठविण्यात आली आहे. Facebook X-twitter Telegram Whatsapp फोन क्रमांक ०२२ २२६१४१५३ ईमेल पत्ता info@skekap.com आमच्याशी संपर्क साधा

Jayant Patil Declaration Form link

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो Jayant Patil Declaration Form link Jayant Patil Declaration Form link mlc election declaration form Facebook X-twitter Telegram Whatsapp फोन क्रमांक ०२२ २२६१४१५३ ईमेल पत्ता info@skekap.com आमच्याशी संपर्क साधा

मार्क्सवाद संपला आहे ?

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो मार्क्सवाद संपला आहे गेली अनेक दशकं हे पुनःपुन्हा ओरडून सांगितलं जातं आहे.एक साधा प्रश्न आहे, जर तो खरंच संपला असेल तर हे पुनःपुन्हा ओरडून सांगायची गरज का वाटते?कारण यामागं दडली असते एक भीती, जी प्रस्थापित वर्गाला आतून सतत पोखरत असते.या भांडवली जगात जगण्याची जणू जीवघेणी स्पर्धाच लागली आहे, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत इतरांना मागे टाकण्यासाठी धावतो आहे. त्यामुळे तो इतरांपासून सतत दुरावला जातो आहे. त्याला हवं असणारं आयुष्य तो जगू शकत नाही आहे आणि तो जे जगतो आहे ते त्याला नको आहे यामुळे तो स्वतः पासून देखील दुरावला जातो आहे. इतरांना दाखवताना सगळं काही आलबेल असल्याचा मुखवटा पण प्रत्यक्ष जगताना मात्र सगळे एका भयाण स्वप्नात असल्यासारखे जगत आहेत. भांडवली व्यवस्थेने बहुसंख्य माणसांना भौतिक कंगालपण आणि सर्वांनाच आत्मिक पोकळपण दिलंय.   गोडसे समर्थक कार्यकर्त्याचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेशमोडकळीस आलेल्या भांडवली व्यवस्थेचा भेसूर चेहरा आता अधिकाधिक स्पष्ट होत चालला आहे. आपण सर्वांसमोर उघडे पडतो आहोत हे लपवण्यासाठी तिला विविध क्लृप्त्या योजाव्या लागतात, मग एकीकडे खोटे शत्रू उभे करायचे, देशादेशात युद्धं चालू ठेवायची, सामाजिक, धार्मिक वातावरण कायम पेटतं राहील याची तजवीज करायची आणि इतकं होऊन देखील या शोषणाच्या विरोधात कोणी आवाज उठवलाच तर त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि त्याही पुढे जाऊन प्रत्यक्ष हल्ले करायचे, हे सगळं याच भीतीतून येतं.   गोरख पांडेंच्या शब्दात बोलायचं झालं तर, त्यांना भिती वाटते की, एक दिवस लोकं त्यांना घाबरायचं थांबवतील याची कारण त्यांच्याकडे गमावण्यासाठी काहीच उरलेलं नसेल.करोना नंतरच्या काळात हे चित्र अधिक भेसूरपणे स्पष्ट झालं आहे.गेल्या वर्षभरात भारतात जवळपास १३००० व्यवसाय बंद झाले. हा फक्त नोंदणीकृत कंपन्यांचा आकडा, बाकी छोटे व्यवसायिक, हातावर पोट असणारे दुकानदार आणि त्यांच्याकडे काम करणारे कुशल-अकुशल कामगार यांची नोंद कुठेच नाही. अगदी सरकाने देखील निर्ल्लजपणे डेटा उपलब्ध नाही असे सांगितले. साधारण ११ लाख नोकऱ्या गेल्यात. या कमवणाऱ्या हातांवर चालणारी तोंड विचारात घेता एकूण बाधित लोकांची संख्या कैक पटीने वाढते.आणि विरुद्ध चित्र काय सांगतं?लॉकडाऊनच्या काळात भारतातील अब्जाधीशांची संपत्ती ३५% वाढली. भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीतील पहिल्या ११ लोकांची संपत्ती एकत्रितपणे मनरेगाचा किंवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा पुढील साधारण १० वर्षाचा खर्च उचलू शकेल. महामारीच्या काळात देशात सत्ताधार्यांच्या निकटचे उद्योगपती मुकेश अंबानी तासाला जितके पैसे मिळवत होते तितके मिळवण्यासाठी एका सामान्य कामगाराला साधारण दहा हजार वर्षे लागतील, असो.   जागतिक पातळीवरदेखील साधारण हीच परिस्थिती दिसते. एका बाजूला, जगातील पहिल्या एक हजार श्रीमंतांना त्यांची महामारी पूर्वीची सांपत्तिक स्थिती गाठायला केवळ ९ महिने लागले आणि दुसऱ्या बाजूला जगातील गरिबांना ही स्थिती गाठायला १४ पट जास्त वेळ लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. हा आकडा साधारण एक दशक इतका भरतो. आज जगातील सर्वात श्रीमंत १० लोकांची फक्त महामारी नंतर वाढलेली संपत्ती एकत्र केली तर ती जगातील प्रत्येकाच्या COVID-19 लसीचे पैसे देऊ शकेल इतकी होईल.याचा अर्थ असा होत नाही की याला फक्त आणि फक्त करोना कारणीभूत आहे. जागतिकीकरणाची लक्तरं दिसायला केव्हाच सुरुवात झाली होती, करोना प्रादुर्भावाने जागतिक अर्थव्यवस्थेची उरली सुरली लक्तरं वेशीवर टांगली इतकंच.विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भांडवली जगामध्ये जे काही बदल घडत गेले त्यातून जगाला नवउदारमतवाद मिळाला. लोकशाहीच्या चकचकीत कोंदणात बसवून उत्तमोत्तम जाहिरातींद्वारे तो जगाच्या गळी उतरवला गेला, जगभरात त्याचे अनेकांनी पायघड्या पसरून स्वागत देखील केले. पण पाहता पाहता त्याची पडझड सुरू झाली. सध्याचे चित्र लक्षात घेता नवउदारमतवाद म्हणजे एक सजवून ठेवलेलं निर्जीव प्रेत आहे की काय इतपत त्याची वाताहत झालेली दिसून येते आहे.   ऑक्सफॅमच्या एका अभ्यासानुसार जगातील फक्त २६ व्यक्तिंकडे जगातील ५०% गरिबांच्या इतकी संपत्ती आहे. गेल्या १० वर्षांत अब्जाधीशांची आणि वित्तीय घोटाळ्यांची संख्या दुपट्टीने वाढली आहे. ग्लोबल वेल्थ डेटा बुकनुसार जगातली ४५% संपत्ती ही जगातल्या १% लोकांच्या मालकीची आहे.हे आकडे आणि आपल्या भवतालातलं जगणं याची सांगड घालू म्हटलं तरी शक्य नाहीय. रोज करोडो माणसांचं शोषण करणारी भांडवली व्यवस्था हीच मुळात एक पॅरासाईट म्हणून काम करत असते.भारतात परिस्थिती अधिकच भयाण आहे.   याला अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे केंद्रातील भाजप सरकारचं सपेशल फसलेलं आर्थिक नियोजन, आत्मकेंद्री आणि अहंकारी नेतृत्व.नोटाबंदीचा तुघलकी निर्णय घेतला त्यावेळी ती लढाई दहशतवादाविरुद्ध होती, मध्यावर येता येता तिला काळ्या पैशा विरुद्धची लढाई घोषित करण्यात आले आणि शेवटी एक दिवस असा आला की हीच लढाई ‘कॅशलेस’ भारताची नांदी म्हणून गायली गेली. हाती काय लागलं? एकट्या नोटाबंदीने साधारण ३० कोटी असंघटित कामगारांना रस्त्यावर आणलं त्यात कंत्राटी कामगार, बांधकाम मजूर, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर यांचा समावेश होता. कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. त्यानंतर कसलीही पूर्वतयारी न करता लागू झालेला जीएसटी, धडपणे न चालणारे पोर्टल, वेगवेगळे जीएसटी दर आणि सतत बदलणारे नियम या सगळ्यांनी छोटे व्यवसायिक जेरीला आलेत.   आज सार्वजनिक उपक्रमातून केल्या जाणाऱ्या निर्गुंतवणुकीचा वेग, महागाईच्या वेगाला लाजवेल इतका आहे. शेतकरी पोटतिडकीने नको म्हणत असताना त्याच्यावर थोपवले गेलेले कार्पोरेट धार्जिणे शेती कायदे, बँकांचे खाजगीकरण, एफआरडीआय कायदा, सरकारी कंपन्यांची विक्री, अशा अनेक गोष्टी या स्थितीला अधिकच चिघळवणारे आहेत.भारतामध्ये गेल्या तीन वर्षात बड्या कार्पोरेट धेंड्यांची साधारण ६ लाख कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित म्हणजे राईट ऑफ झालीत. राईट ऑफ म्हणजे कर्जमाफी नव्हे असं सरकार आणि बँका कितीही म्हणत असतील पण काहीही ‘अर्थ’ नाही. पैसे परत येण्याची आशा नाही मग अशावेळी बँकांचा तोटा दिसू नये म्हणून या न फेडल्या गेलेल्या कर्जाला दिलं गेलेलं गोंडस नाव म्हणजे राईट ऑफ.नव्वदच्या दशकात ज्यांनी भांडवलशाहीचा विजय झाला म्हणून गौरव गीतं गायली, आज त्यातील एकही जण त्यानंतरच्या सामाजिक, आर्थिक आणि मानवी मूल्यांच्या पतनाची जबाबदारी घ्यायला पुढं येण्यास तयार नाही. बाकी काही असो सगळ्यांचं एक पालुपद मात्र नक्की सुरू असतं, मार्क्सवाद संपला आहे.   पण आज याच्या अगदी उलट परिस्थिती दिसत आहे. मार्क्‍सवादी विचारांची परंपरा, त्यामागची प्रेरणा, तिची नीतिमूल्यं आज पुन्हा एकदा सामाजिक शास्त्रांमध्ये जोर धरत आहेत. आज जगातील बहुतांश भागात, प्रत्येक सामाजिक विचारात, मानवी मूल्यांच्या न्याय्य लढाईमध्ये मार्क्‍सवादाचा वैचारिक संदर्भ आधारभूत मूल्य म्हणून घेतला जातो आहे. भांडवलशाहीतील अरिष्ट चक्रांनी पिडले गेलेले लोक आज पुन्हा एकदा मार्क्सवाद समजू घेऊ पाहता आहेत.मार्क्स नंतरच्या इतक्या दीर्घ काळानंतर मार्क्‍सवाद आणि समाजवाद यांचे नेमके काय झाले? काय बदलले? आणि काय उरले? याचा विचार केवळ मार्क्‍सवादासाठी नव्हे, तर एकूण मानवी समाजाच्या भवितव्यासाठी गरजेचा आहे.कारण मुद्दा आहे तो हा की आजच्या प्रश्नांमधून मार्ग कसा काढायचा, त्याची पद्धती कोणती आणि दिशा कोणती?अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर, माणूस म्हणजे आपण आनंदाच्या शोधात असतो का? आपल्या भवतालची माणसं आनंदी नाहीत म्हणून आपण अस्वस्थ असतो का? सर्वाना समान वागवलं जात नाही याचा आपल्याला त्रास होतो का? पितृसत्ताप्रधान, जातिव्यवस्थेवर आधारित समाज रचनेचे असणे आपल्याला अमानवी वाटते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यांची उकल करण्यासाठी आपण वाचत असतो, बोलत असतो, विचार करत असतो आणि कृती करत असतो. पण याची मुळातून उत्तरे शोधायची कशी हे जोपर्यंत मार्क्सशी आपली ओळख होत नाही

लेनिन नावाचा अजरामर माणूस..

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो लेनिन नावाचा अजरामर माणूस लेनिन… जगाने अनुभवलेलं एक बिलोरी स्वप्न… व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून रशियात समाजवादाचा बीज पेरणारा हाडाचा क्रांतिकारक. क्रांतीच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख जोडून परिवर्तनाची पहाट आणणारा उगवत्या जगातील लाल सूर्य. विषमतेविरुद्ध लढणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील सच्च्या कार्यकर्त्यांच्या हृदयातील स्फुर्तीचा जिवंत झरा. सबंध जगावर आपल्या निस्सीम कर्तृत्वाने छाप पाडणारा एक मोठा माणूस. मृत्यूच्या 96 वर्षानंतरही ज्याच्या प्रेताच्या दर्शनासाठी रोज रांगा लागतात असा लोकप्रियतेचे शिखर गाठलेला रशियाचा अजरामर राष्ट्राध्यक्ष म्हणजे ब्लादिमीर लेनिन. 22 एप्रिल 1870 ला व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावरील सिम्बीस्क्र गावात एका शिक्षकाच्या पोटी सुसंस्कृत आणि सुखी कुटुंबात लेनिनचा जन्म झाला. सहा भावंडांतील लेनिन हे तिसरे अपत्य होतं. शालेय जीवनात हुशार विद्यार्थी असणाऱ्या लेनिनने आपल्या अखेरच्या शिक्षणातील पदवी चार वर्षाच्या अभ्यासक्रमाची असूनही एका वर्षात पूर्ण केली व सुवर्णपदक पटकावले. 1886 ला त्याच्या वडिलांचे निधन झाले. 1887 ला तिसरा झार याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून लेनिनचा भाऊ अलेक्झांडर याला अटक होऊन फाशी दिली गेली, तर मोठी बहीण अँना हिलाही तुरुंगवासाची शिक्षा झाली. या घटनेचा मोठा आघात लेनिनच्या मनावर झाला. लेनिन कझान विद्यापीठात कायदा व अर्थशास्त्राचा अभ्यास करत होता. कझान विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी लेनिनच्या भावाला दिलेल्या फाशीविरोधात आंदोलन केल्याने पंचेचाळीस मुलांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. त्यामध्ये लेनिन सुद्धा होता. तेव्हापासून त्याच्याकडे क्रांतिकारकाचा भाऊ म्हणून सर्वजण पाहू लागले व इतर कोणत्याही विद्यापीठात प्रवेश मिळू शकला नाही. पण त्याच्या आईच्या प्रयत्नांमुळे सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून परीक्षा देण्याची अनुमती मात्र त्याला मिळाली व तो प्रथम क्रमांकाचा विजेता विद्यार्थी ठरला. 1892 ला पदवी मिळाल्यावर त्याने वर्षभर वकिली केली. शेतमजूर व कामगार यांचे दावे लढवले. तत्पूर्वी 1888 पासूनच त्याने विविधांगी वाचन करायला सुरुवात केली होती. त्याने 1888 ला मार्क्सवादाचा अभ्यास सुरू केला. 1890 मध्ये लेनिनने ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’चे रशियन भाषेत भाषांतर केले. पुढे त्याने साम्यवादाचा प्रसार करण्यासाठी स्विझर्लंड, फ्रान्स आणि जर्मनीचा दौरा केला. आयुष्यातील काही वर्ष लेनिन अनेक देशात फिरला. काही वर्ष तुरुंगात तर पंधरा वर्षे त्याला निर्वासित म्हणून जीवन जगावं लागलं. खडतर हाल अपेष्टांचा संघर्ष त्याच्या वाट्याला आला होता. त्यात त्याची उपासमारही होत होती. तरीही त्याने मनाला आणि आणि शरीराला अजिबात थकवा जाणवू दिला नाही. लेनिन अहोरात्र आपल्या क्रांतिकार्यात मग्न राहिला. 1898 ला त्याने आपली जुनी सहकारी मैत्रीण नादेझ्दा कृपस्काया हिच्यासोबत विवाह केला. एका सरकारी अधिकाऱ्याची ती हुशार मुलगी होती. क्रांतिकार्याला तिने भरपूर मदत केली. रशियाबाहेर राहूनही 1912 पासून रशियात प्रसिद्ध होत असलेल्या “प्रावदा” या प्रसिद्ध दैनिकातून लेनिनने विपुल लेखन केले. पहिल्या महायुद्धाच्या काळात तर त्याने युद्धाला विरोध करून रशियातील आपल्या बोल्शेविक गटाला क्रांतिकार्याला प्राधान्य देण्याचे सूचित केले होते. अखेर ऑक्टोंबर 1917 ला लेनिनच्या नेतृत्वाखाली रेड आर्मीने क्रांती यशस्वी केली व झारची सत्ता उलथून पडली. तेव्हा जगाला आश्चर्याचा धक्का बसला. परंतु हे काही सहजासहजी घडलं नव्हतं. तर भांडवलशाही उलथवून पाडणे व समाजवादाचा प्रचार करणे यासाठी समविचारी लोकांच्या शोधात व प्रबोधन करण्यात लेनिनने अनेक वर्षे युरोपभर स्वतःला झोकून दिले होते. त्याला विविध ठिकाणी राहावे लागले. जहाल लेख लिहावे लागले. राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगवास पत्करावा लागला. “रशियातील भांडवलशाहीचा विकास” नावाचा ग्रंथ लिहावा लागला. प्रचंड लेखन व वाचन करावे लागले. मार्क्सवादाला जोड देऊन त्यात सुधारणा करत लेनिनवादावर प्रकाश टाकावा लागला. रशियातील बोल्शेविक पक्षाला मदत करावी लागली. अनेक मित्र जोडावे लागले. शास्त्रीय समाजवाद मांडून त्याला मूर्त स्वरूप देत रशियन राज्यक्रांती घडवून आणावी लागली. तेव्हा झार संपला आणि नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित झाली. लेनिनने जगाला आश्चर्यकारक असे कार्य घडवून आणले होते. त्याचे चौफेर ज्ञान इतके होते की, ते पाहून शास्त्रज्ञांनाही त्याचा हेवा वाटत होता. हौस, मौज आणि चैन हे शब्द लेनिनच्या डायरीतच नव्हते. लेनीनचा परिवार अत्यंत काटकसरीने अन्नपदार्थ वापरून साधी कपडे घालणारा होता. जुनी कपडे पुन्हा शिवून वापरणारा होता. एकदा स्त्रीवादी चळवळीतील गाजलेल्या जर्मन नेत्या. क्लारा झेटकीन मास्को येथे लेनिनला भेटायला आल्या होत्या. तेव्हा निर्वासित अवस्थेत असताना जो सूट लेनिनने घातला होता तोच त्या भेटीतही होता. हे पाहून क्लारा झेटकिन आश्चर्याने थक्क झाल्या. लेनिनने चंगळवादी जीवनाचा पूर्ण त्याग केला होता. 1917 च्या क्रांतीनंतर न्यूयॉर्क टाइम्स चा प्रतिनिधी राष्ट्राध्यक्ष लेनिनला भेटायला आला. त्यावेळी त्याच्या समोर समाजवादी रशियाच्या स्वप्नासंबंधी लेनिनने जे भाष्य केले ते ऐकूण त्या पत्रकाराने न्यूयॉर्क टाइम्स मध्ये लेनिनला ‘क्रेमलिन मधला स्वप्नाळू’ संबोधत त्याची खिल्ली उडवणारी एक बातमी दिली. पण तोच पत्रकार जेव्हा लेनिनला पाच वर्षानंतर भेटला, तेव्हा लेनिनने सांगितलेल्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी सत्यात उतरल्या होत्या हे पाहून त्याने लेनिनचे भरभरून कौतुक केले. “विचाराविना केलेली कृती आंधळी असते आणि कृतीविना केलेला विचार वांझोटा असतो”, हे तत्त्व लेनिनने प्रत्यक्ष जीवनामध्ये अमलात आणले होते. रशियात जेव्हा लेनिनची सत्ता आली तेव्हा त्याने रशियाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन पोहोचवले. आजारी व्यक्तींना चांगले अन्न, योग्य औषधोपचार व विश्रांती मिळावी याची त्याने काळजी घेतली. लहान मुलांना वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मोफत अन्न देण्याची व्यवस्था केली. जिथे जाईल तिथे सर्वांसोबत जे उपलब्ध असेल तेच खाणारा, लोकांनी आपल्याला घरी काय खाद्यपदार्थ दिले तर ते मुलांसाठी बालभवनला पाठवणारा लेनिन हा एक कर्तव्यदक्ष राष्ट्राध्यक्ष होता. लेनिनने स्वतःच्या पत्नीला शिक्षण उपमंत्री करून विविध शैक्षणिक योजना राबवल्या. हातात घेतलेल्या कामात मन ओतायची कला लेनिनजवळ जास्त होती. सर्वांना पाव मिळाल्याशिवाय कोणालाच केक मिळणार नाही हे रशियन कम्युनिस्टांचे त्यावेळचे ब्रीदवाक्य होते. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी लेनिनने खूप प्रयत्न केले. मंत्र्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सारखेच जेवण मिळेल याची व्यवस्था त्याने केली. लेनिनने अत्यंत प्रभावशाली उपक्रमांची आखणी करून रशियाला आमूलाग्र बदलून टाकले. सैद्धांतिक कार्याची व्यापक व्यावहारिक कार्याशी सांगड घालणाऱ्या लेनीनचे ज्ञान विश्वकोशाच्या तोडीचे होते. लेनिनच्या राहत्या घरी प्रत्येक खोलीत पुस्तकाचे कपाट तर होतेच पण क्रेमलिनमधल्या अभ्यासिकेत खच्चून भरलेल्या 6 तिजोऱ्या पुस्तके होती. शिवाय त्याच्या खाजगी ग्रंथालयात दहा हजारापेक्षा जास्त पुस्तके व नियतकालिके होती. मार्क्स व एंगल्सचे ग्रंथ लेनीनचे कायमचे पाठ्यग्रंथ तर होतेच, शिवाय त्याच्या दररोज उशाला सोव्हीयत प्रजासत्ताकाचे ‘कायद्याचे पालन करा’ ही छोटीशी पुस्तिका ठेवलेली असायची. लेनिन रात्रीचे दोन वाजेपर्यंत आपल्या अभ्यासिकेत बसून अभ्यास करायचा तर लगेच पुन्हा सकाळी सहा वाजता अभ्यासिकेत परतायचा. सरकार हाती आल्यानंतर लेनीनने सरकारी कर्मचाऱ्यांना अनुभवांनी समृद्ध व्हा व कार्यक्षमतेने दप्तर दिरंगाई टाळून काम करा, असा संदेश दिला होता. अधिकार्‍यांना त्याने सक्त आदेश दिला होता की, जनतेच्या लेखी तक्रारी 24 तासाच्या आत तर तोंडी तक्रारी 48 तासांच्या आत माझ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच अपराध्यांना अटक करताना सुट्टीच्या दिवशी अटक करावी व कामाच्या दिवशी त्याला सोडावे म्हणजे त्याच्या कामात व्यत्यय येणार नाही. असाही त्याचा आदेश असायचा. अशा या असाधारण शिस्तबद्ध पुरुषाने लाचलुचपत, दप्तर दिरंगाई, दुसऱ्याबद्दल बेपर्वाईचे वर्तन हे सर्वात मोठे गुन्हे ठरवून देशाच्या कायद्यावर कुरघोडी करणाऱ्या, त्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या, व्यक्तिगत फायद्यासाठी आपल्या स्थानाचा उपयोग करून घेणाऱ्या व्यक्तींबद्दल लेनिनने कधीच दया दाखवली नाही. असे कोणतेही क्षेत्र नाही की लेनीनने त्याबाबत मार्गदर्शन केले नाही. अगदी लिहिणाऱ्यांना ही तो नेहमी बजवायचा

वैदिकांनी गौण बनविलेला बहुजनांचा महान नायक “मारुती”

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो वैदिकांनी गौण बनविलेला बहुजनांचा महान नायक “मारुती” (५ मे १८१८–१४ मार्च १८८३) मारुति’ हा शब्द ‘मरुत्’ या शब्दापासून बनला आहे. मरुताचा पुत्र तो ‘मारुति’ होय. मरुताचे वंशापत्य, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ मारुती हा मरुताचा पुत्र वा मरुताच्या वंशात जन्माला आलेला पुरुष ठरतो. मारुतीचा मरुताशी जवळचा संबंध आहे. हे यावरून स्पष्ट होते. मरुत् हा केवळ एक पुरुष नसून तो अनेक जणांचा गण होता. त्यामुळेच ‘मरुत्’ हा शब्द वैदिक वाङ्मयात बहुतेक वेळा बहुवचनात वापरला जातो. मरुतांविषयी वैदिक ग्रंथांनी केलेले काही निर्देश आधी उद्धृत करावेत आणि मग त्यांच्या संबंधी काही विवेचन करावे, असे माझ्या मनात आहे. या मरुतांच्या संदर्भात वैदिक ग्रंथांनी घेतलेली एक भूमिका आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. ग्रंथांनी मरुतांचा परिचय देताना त्यांना वारंवार ‘विश’ किंवा ‘विशः’ असे म्हटलेले आहे. या शब्दांचा अर्थ प्रजा, जनता, सर्वसामान्य लोक असा होतो. ‘विश्’ या शब्दापासून ‘वैश्य’ हा शब्द बनलेला आहे. चार वर्णापैकी तिसरा वर्ण म्हणून तो ज्ञात आहेच. वैदिकांनी देवांमध्येही चातुर्वर्ण्य असल्याचे मानले आहे. बृहस्पती हा ब्राह्मण, इंद्र हा क्षत्रिय आणि मरुत् हे वैश्य असे त्यांचे वर्गीकरण आहे. या सर्व बाबी ध्यानात घेतल्या असता ‘मरुत्’ हा शब्द भारतीय समाजातील सर्वसामान्य जनतेचा निदर्शक आहे, असे म्हणता येते. त्यामुळे मारुती हा प्राचीन काळातील सर्वसामान्य लोकांचा म्हणजे बहुजन समाजाचा एक अत्यंत मातब्बर असा प्रतिनिधी होता, असे म्हणता येते. हा काळ अगदी सिंधू संस्कृतीपर्यंत जातो. तेव्हापासून भारतातील खेड्यापाड्यांतून मारुतीविषयी आत्यंतिक जिव्हाळा आणि अपार आदर आढळतो. हा आदर म्हणजे आपल्या एका अत्यंत कर्तबगार अशा प्राचीन महापुरुषाविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता म्हणता येईल. तसेच त्याच्यापासून प्रेरणा घेण्याची उत्कट इच्छाही म्हणता येईल.काळाच्या ओघात मारुतीचे काही प्रमाणात दैवतीकरण करण्यात आले. रामायणात त्याला रामाचा निष्ठावंत भक्त बनविण्यात आले आणि तो राम ब्राह्मण वर्णाच्या हातातील कळसूत्री बाहुले असल्याची वर्णने करण्यात आली. याचा अर्थ पर्यायाने मारुतीला वैदिक परंपरेने आपल्या व्यवस्थेचा एक समर्थक दुवा बनविले. वैदिकांनी मारुतीच्या व्यक्तित्वावर चढविलेली ही पुटे दूर केल्यानंतरच बहुजनांना अस्सल स्वकीय अशा मारुतीचे दर्शन घडू शकेल. मरुत हे अनेकदा इंद्राचे सहकारी म्हणून येत असले आणि वैदिक वाङ्मयात त्यांचा वैदिक देवतांमध्ये अंतर्भाव करण्यात आला असला, तरी त्यांचा इंद्राबरोबर अनेकदा संघर्ष झाल्याचेही दिसते. राजाला कर देणे हे प्रजेचे कर्तव्य मानले जाते. याच अर्थाने प्रजेला राजाचे अन्न, भक्ष्य वा खाद्य म्हटले जाते. स्वाभाविकच, मरुत हे इंद्राचे अन्न असल्याचा निर्देश वैदिक ग्रंथांतून आढळतो. मरुतांनी इंद्राची अशी ताबेदारी नेहमीच मानली, असे मात्र नाही. त्यांनी इंद्राला कर देण्यास नकार दिल्याचे वर्णन तैत्तिरीय ब्राह्मणाने पुढीलप्रमाणे केले आहे, “इंद्राची स्वतःची प्रजा असलेल्या मरुतांनी त्याला कर दिला नाही.” प्रजेविषयी आणि वैश्यांविषयी तुच्छतेचा भाव वैदिक ग्रंथांनी अनेकदा व्यक्त केला आहे. खरे तर, वैदिक व्यवस्थेने वैश्यांना द्विज मानलेले आहे. शूद्रांना जसे वेद, यज्ञ वगैरेंवा अधिकार नाकारून सर्व प्रकारच्या प्रतिष्ठेपासून वंचित करण्यात आलेले होते, तसे वैश्यांच्या बाबतीत करण्यात आले नव्हते. असे असले, तरी समाजातील त्यांचे स्थान ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या बरोबरीचे नव्हते. त्यांच्याकडे एक प्रकारच्या तिरस्कारानेच पाहिले जात होते. याचे अनेक पुरावे वैदिक वाङ्मयात आढळतात. तैत्तिरीय ब्राह्मणाने म्हटले आहे, “वाजसृतांना (ऋत्विज) सुराग्रह देतो. याद्वारे तो वैश्यांना (प्रजेला) अनृतानेच संयुक्त करतो.” यावर भाष्य करताना सायणाचार्यांनी म्हटले आहे, “ ‘वाजसृत्’ म्हणजे अन्न निर्माण करणारे वैश्य होत. त्यांच्यासाठी सोमरसाने रहित असे सुराग्रह म्हणजे मद्याचे प्याले द्यावेत. मद्याच्या पापरूपत्वामुळे अनृताशी समान असलेल्या आणि जन्माने अधम असलेल्या वैश्यांना (यजमानाने) अनृतानेच युक्त केल्यासारखे होते.”ज्यांच्या आचरणात मुळात अमृत वा खोटेपणा नाही, त्यांच्या जीवनात मुद्दाम खोटेपणा निर्माण करून त्यांना डाग लावण्याची याज्ञिकांची ही तर्हा किती मनुष्यद्वेष्टी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वैश्यांचे वर्णन करताना ‘जन्माने अधम’ या अर्थाची शब्दरचना करण्यात आली आहे, हेही लक्षणीय आहे.मरुतांसाठी ठेवावयाची हविर्द्रव्ये वेदीच्या दक्षिण बाजूला ठेवावीत आणि इतर देवतांसाठी असलेली हविर्द्रव्ये उत्तर बाजूला ठेवावीत, असे तैत्तिरीय ब्राह्मणानेच म्हटले आहे. मरुतांना म्हणजेच वैश्यांना दूर ढकलण्याच्या दृष्टीनेच असे करण्यात आले आहे. या ग्रंथांनी पुढे स्पष्टपणे तसे म्हटलेले आहेच, “(ती हविर्द्रव्ये) वैश्यांना ब्राह्मणांपासून आणि क्षत्रियांपासून दुसरीकडे ढकलून देणारी होतात.”मरुतांविषयी अशा प्रकारचा तिरस्कार असल्यामुळे आणि अनेकदा यज्ञामध्ये त्यांना बरोबरीने वागविले जात नसल्यामुळे त्यांनी यज्ञाला विरोध करणे स्वाभाविकच होते. तैत्तिरीय ब्राह्मणाने म्हटले आहे, “मरुतांनी प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्याची इच्छा केली.” या भाष्य करताना सायणाचार्यांनी म्हटले आहे, “प्रजापतीचा सप्तदशप्रजापतिरूप यज्ञ होता. तो यज्ञ पर्यग्निकरणानंतर नष्ट करण्यास मरुत सज्ज झाले.” मरुत हे वैदिक व्यवस्थेशी पूर्णपणे समरस झालेले नव्हते, याचा हा स्पष्ट पुरावा आहे. स्वाभाविकच, मारुतीचे कितीही वैदिकीकरण झाल्याचे आज दिसत असले, तरी मारुती हे व्यक्तित्व बहुजन समाजाशीच प्रामुख्याने जोडले गेलेले आहे. लेखक – डॉ.आ.ह.साळुंखे Facebook X-twitter Telegram Whatsapp फोन क्रमांक ०२२ २२६१४१५३ ईमेल पत्ता info@skekap.com आमच्याशी संपर्क साधा

कार्ल मार्क्स

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो कार्ल मार्क्स (५ मे १८१८–१४ मार्च १८८३) साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता. १९१८ साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि १९४९ मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा मूळ प्रणेता. यहुदी वा ज्यू मातापितरांपासून पश्चिम जर्मनीतील ऱ्हाइनलंड या प्रांतातील ट्रीर शहरात कार्लचा जन्म झाला. पित्याचे नाव हाइन्‍रिख पित्याचा वकिलीचा धंदा चांगला चालत होता. त्याला खिश्चन धर्माचा स्वीकार करावा लागला त्याला ज्ञानोदय आंदोलनामध्ये रस होता, त्याचे कांट आणि व्हॉल्सेअर हे आवडते लेखक. कार्लला वयाच्या ६व्या वर्षीच बाप्तिस्मा मिळाला. कार्लचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ट्रीर याच गावी झाले. ज्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले त्याच्यावर सरकारची कडक नजर होती कारण तेथे उदार स्वातंत्र्यवादी विचाराच्या प्रभावाखाली काम करणारे शिक्षक होते. कार्ल मार्क्सच्या कुमारवयातील लेखनामध्येच मानवजातिकरता ख्रिस्ताप्रमाणे आत्मयज्ञ केला पाहिजे या उदात्त भावनेची अस्वस्थता व्यक्त होते: १८३५ मध्ये बॉनविद्यापीठामध्ये त्याला प्रवेश मिळाला. त्याने मानव्यविद्यांचा अभ्यासक्रम सुरू केला. ग्रीक व रोमन पुराणविद्या आणि कलेचा इतिहास हे विषय मार्क्सने निवडले होते. विद्यार्थ्याच्या बहिःशाल कार्यक्रमांमध्ये त्याने खूप रस घेतला. तो द्वंद्वयुद्धामध्येही लढला आहे. विद्यार्थ्याच्या राजकीय चळवळीमध्ये त्याने पुढारीपण केले. बंडखोर कविमंडळाचा सदस्य होऊन कविता लेखनही केले. विद्यार्थ्याच्या राजकारणाला भरती आली होती. १८३६ साली बॉन शहर सोडून बर्लिन विद्यापीठामध्ये विधिशास्त्र (कायदा) आणि तत्त्वज्ञान या विषयांकरता प्रवेश मिळवला. बर्लिन येथे यंग हेगेलियन-तरुण हेगेलवादी-मंडळींच्या सहवासात मार्क्स आला. तत्त्वज्ञान आणि साहित्य या विषयांसंबंधी नवे विचारप्रवाह बर्लिनच्या बुद्धिमंत आणि साहित्यकारामध्ये खळखळून वहात होते. त्यांच्यामध्ये ब्रूनो बाउअर हा प्रमुख होता. हा धर्मशास्त्राचा व्याख्याता होता. मानवाच्या भावनात्मक आत्यंतिक गरजांमधून निर्माण झालेल्या अद्‌भुतरम्य दिवास्वप्‍नांची निर्मिती म्हणजे ख्रिस्ती बायबलमधील धर्मोपदेश होत आणि स्वतः ख्रिस्तही तसाच होय. ख्रिस्त ही ऐतिहासिक व्यक्ती नाही. फार मोठी सामाजिक उलथापालथ नजिकच्या भविष्यकाळी होणार आहे, असा भविष्यवाद बाउअर शिकवीत होता. बाउअर याला १८३९ मध्ये सरकारने विद्यापीठातून हाकलून दिले. तो कार्ल मार्क्सचा अत्यंत निकटचा मित्र होता. येना विद्यापीठाला १८४१ मध्ये आपला डॉक्टरेटचा प्रबंध कार्ल मार्क्सने दिला. डीमॉक्रिटस आणि एपिक्यूरस या ग्रीक निसर्गतत्त्ववेत्त्यांच्या तत्त्वज्ञानाची हेगेलियन दृष्टिकोनातून मार्क्सने या प्रबंधात छाननी केली आहे. या प्रबंधामध्ये मार्क्सने म्हणले आहे : ‘तत्त्वज्ञान ही गोष्ट लपवीत नाही ती म्हणजे प्रॉमीथिअस या देवपुत्राची कबुली. तत्त्वज्ञानालाही सगळ्या देवांची घृणा आहे. प्रॉमीथिअस महान संत व हुतात्मा होता, ही गोष्ट तत्त्वज्ञानाच्या इतिहासाने नोंदवली आहे.’ विद्यापीठीय पदवी मिळण्यापूर्वीच तो डाव्या तरुण हेगेलवाद्यांच्या गटाचा सदस्य बनला आणि कडवा अनीश्वरवादी नास्तिक म्हणून प्रसिद्धीस आला. तेव्हाच त्याने जीवनातील एक सिद्धान्त निश्चित केला तो म्हणजे ‘धर्माची समीक्षा सर्वसमीक्षेचा प्रारंभ होय.’या त्याच्या नास्तिक्याच्या प्रसिद्धीमुळे प्रशियन सरकारने त्याला विद्यापीठातून काढून टाकले. मार्क्सचा अनीश्वरवाद अधिक खोलावला तो लुडबिग फायरबाख याच्या एसन्स ऑफ ख्रिश्च्यनिटी या ग्रंथामुळे. या ग्रंथामुळेच कार्ल मार्क्स हेगेलपासून दूर गेला आणि त्याचे भौतिकवादी तत्त्वज्ञान अधिक पक्के झाले. हेगेलचा विरोध-विकासवाद आणि फायरबाखचा भौतिकवाद यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्‍न मार्क्स सतत करीत राहिला. १८४२ जानेवारीमध्ये जर्मनीतील कोलोन या शहरातून प्रसिद्ध होणाऱ्या ऱ्हाइनिश्चे झाइटुंग या वृत्तपत्रात मार्क्सने लेखन सुरू केले. मार्क्सने लेखनस्वातंत्र्यावर जे लेखन केले आहे, ते ह्याच काळातील होय. कोलोन हे शहर त्या काळी जर्मनीतील पुढारलेले औद्योगिक शहर होते. त्या शहरातील तरुण व्यापारी, बँक चालविणारे आणि उद्योजक यांच्या गटाचे उदार लोकशाहीवादी मुखपत्र म्हणून वरील वृत्तपत्र चालविले जात होते. मार्क्सने लेखनस्वातंत्र्याबद्दल असा मुद्दा मांडला आहे की, ‘दुबळे आणि दुर्बुद्धीचे मर्त्य मानव जेव्हा दुसऱ्याच्या लेखनस्वातंत्र्यावर आघात करतात, मर्यादा घालतात, तेव्हा ते स्वताःला सर्वज्ञ समजत असतात’. या कालखंडात मार्क्सची उच्चतम नैतिक मानदंडावर आणि विश्वव्यापी नीतिशास्त्रावर श्रद्धा होती. १५ ऑक्टोबर १८४२ रोजी ऱ्हाइनिदचे झाइटुंग या वृत्तपत्राचा तो संपादक बनला. त्यात साम्यवादाची एका नव्या रूपात मांडणी त्याने सुरू केली. व्यावहारिक बुद्धीचे, उदारमतवादी, कायद्याच्या मर्यादेत राहून स्वातंत्र्याचा विस्तार करावा अशा मताचे लोक त्याने आपल्या मित्रमंडळीत सामावून घेतले होते. जर्मनीच्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये मार्क्सच्या वृत्तपत्राने प्रमुख स्थान मिळविले. त्याचा तिप्पट खप होऊ लागला. रशियन सरकारच्या दबावामुळे जर्मन सत्ताधाऱ्यांनी मार्क्सचे हे वृत्तपत्र बंद पाडले. जेनी व्हान वेस्टफॉलेन या आकर्षक, हुशार, वाखाणलेल्या उच्चकुलीन तरूणीशी त्याची ७ वर्षे मैत्री होती. जून १८४३ मध्ये तिच्याशी मार्क्स विवाहबद्ध झाला. जेनीच्या वडिलांना कार्ल मार्क्स हा तरूण आवडत होता परंतु त्या कुटुंबातील इतर मंडळींना हा विवाह मान्य नव्हता. तिच्या वडिलांना असेही वाटे, की आपण आपल्या मुलीचा मोठ्या असुराला बळी दिला आहे. फ्रेंच साम्यवादाचा आभ्यास करण्याकरता मार्क्स पॅरिसला गेला. फ्रेंच आणि जर्मन कामगारवर्गाच्या साम्यवादी संघटनांशी त्याचा संबंध आला. त्यात या संघटनांची विचारसरणी ओबडधोबड आहे, तिला नीट तर्कशुद्ध आकार नाही, हे मार्क्सच्या लक्षात आले परंतु या कामगार संघटनांच्या जीवनाचा मानवी बंधुत्व हा स्थायीभाव झाला आहे तो केवळ भाषेचा अलंकार राहिला नाही हेही त्याला दिसले. याच काळामध्ये पहिला सुप्रसिद्ध ग्रंथ इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिक मॅन्युस्क्रिप्ट्‍स ऑफ १८४४ मार्क्सने लिहून काढला. याच वर्षी टोअर्ड द क्रिटिक ऑफ द हेगेलियन फिलॉसॉफि ऑफ राइट हा निबंध प्रसिद्ध झाला. धर्म ही जनतेची अफू आहे, हा मार्क्सचा निष्कर्ष या निबंधात आला असून त्याचप्रमाणे कामगारांना उठावाचे आवाहनही त्यातच पहिल्यांदा आले आहे. जर्मन सरकारचे मार्क्सचे बारीक लक्ष होतेच. फ्रांसच्या सरकारने जर्मन सरकारचा रोख लक्षात घेऊन मार्क्सला हद्दपार केले. ५ फेब्रुवारी १८४५ रोजी मार्क्स ब्रूसेल्सला येऊन राहिला. त्याने जर्मन नागरिकताही टाकली. ब्रूसेल्सला आल्यानंतर तेथील २ वर्षांच्या काळात फ्रीड्रिख एंगेल्स याच्याशी समान ध्येयवादामुळे मैत्री दृढ झाली ती जन्मभर टिकली. एंगेल्सचा इंग्‍लंमध्ये मँचेस्टर येथे कापड कारखाना होता. त्यात त्याला १८६४ पासून चांगली मिळकत होत होती. त्या वेळच्या इंग्‍लंमधील औद्योगिक क्रांतीचेही अनुकूल-प्रतिकूल परिणाम त्याला अभ्यासावयास मिळाले. मोझेस हेस, रॉबर्ट ओएन व तरूण हेगेलवादी यांच्या प्रभावाखाली येऊन एंगेल्स अगोदरच साम्यवादी झाला होता. मार्क्सच्या मैत्रीच्या काळात तो साम्यवादाचा तत्त्वज्ञानी बनला. वैचारिक सहकार्य सुरू झाले. त्या दोघाना मिळून प्रथम द होली फॅमिली आणि द जर्मन आयडियॉलॉजी हे दोन महत्त्वाचे ग्रंथ लिहून पूर्ण केले. इतिहासाची भौतिक उपपत्ती सविस्तर रीतीने या ग्रंथांमध्ये मांडली आहे. हे दोन ग्रंथ त्यांच्या हयातीत कधीच प्रकाशित होऊ शकले नाहीत कारण प्रकाशक मिळाला नाही. ब्रूसेल्समध्ये असतानाच कामगार चळवळीच्या मुख्य नेत्यांच्या विचारांशी मार्क्सला सामना करावा लागला. त्यातील काही नेते नीतित्त्वाच्या आधाराने कामगारांच्या गाऱ्हाण्यांना महत्त्व देऊ लागले. तेव्हा मार्क्सने सागितले की अशा केवळ समतावादी नैतिक ध्येयाने क्रांती होऊ शकत नाही. क्रांतीकरता अनुकूल अशी ऐतिहासिक परिस्थिती निर्माण व्हावी लागते. सामाजिक परिवर्तने विशिष्ट कार्यकारणभावाची प्रक्रिया असते. ती नियमबद्ध असते. भांडवलदारी समाजाच्या अवस्थेमध्ये येत असताना ही अवस्था एकदम ओलांडून पलीकडे समाजाला जाता येणार नाही लगेच साम्यवादाकडे जाता येणार नाही. फ्रेंच समाजवादी तत्त्वज्ञ प्रूदाँ याचा द फिलॉसॉफी ऑफ पॉव्हर्टी हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्याबरोबर कार्ल मार्क्सने त्याच्याविरूद्ध खंडन करणारा द पॉव्हर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला. भिन्नभिन्न अर्थव्यवस्थांच्या मधील चांगले गुण घ्यावे आणि दोष टाकावे आणि समन्वय साधावा, असे प्रूदाँचे मत होते. मार्क्सच्या मताने अशी तडजोडीची अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकत नाही. ऐतिहासिक शक्तींचे अपरिहार्य नियम असतात. त्या नियमानुसारे समाजसंस्थेला आकार येतो. विशिष्ट आकार देणारी उच्च-नीच वर्गरचना अपरिहार्यपणेच निर्माण होते. यानंतर द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो ही पुस्तिका एका विलक्षण परिस्थितीमध्ये मार्क्स आणि एंगेल्स यांनी लिहिली आणि ती

भाई जयंत पाटील : कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांचे ठाम वैचारिक नेतृत्व

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो भाई जयंत पाटील : कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांचे ठाम वैचारिक नेतृत्व ७ जुलै १९५५ रोजी प्रभाकर पाटील आणि सुलभाताई पाटील यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. त्यांचे नाव ‘जयंत’ ठेवण्यात आले. जयंतभाईंनी पुढे महाराष्ट्राच्या समाजकारण, अर्थकारण, राजकारण, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. समृद्ध राजकीय व सामाजिक वारसा लाभलेल्या भाई जयंत पाटलांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात अलिबाग पंचायत समितीचे सदस्य म्हणून केली. त्यानंतर रायगड जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर २७ जुलै २००० पासून विधान परिषदेचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत ते आजपर्यंत. राजकारण हा आमचा पैसा कमवण्याचा उद्योग नाही, तर अनेक उद्योगांच्या माध्यमातून कमावलेला पैसाही समाजकारण म्हणून राजकारणात वापरल्याचे भाई रोखठोकपणे सांगतात. मतदारसंघातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर ते सरकारला भर सभागृहात धारेवर धरतात. त्यांच्या भाषणाची चर्चा झाली नाही असे विधिमंडळाचे अधिवेशन सापडणे अवघड आहे. त्यांचे कार्य रायगड जिल्ह्यापुरते मर्यादित नाही. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावागावांत जाऊन त्यांनी तरुणांशी संवाद साधला. दुष्काळ समजून घेतला, त्यानंतर त्यावर उपाय सुचविले. पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ते भरीव कार्य करत असतात. त्यानंतर संघर्षशील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाईंच्या नेतृत्वाखाली ४ मार्च २०१६ रोजी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जाग आली आणि त्यांनी दुष्काळग्रस्तांकडे लक्ष दिले. यानंतर दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा ओघही वाढला. या मोर्चाने मराठवाड्यातील जनतेने आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकरी, दु:खी, कष्टी लोकांचे नेते म्हणून शिक्कामोर्तब केले. असाच एक मोर्चा दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थही भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी हजारो कार्यकर्ते व नागरिक रस्त्यावर उतरले व मोर्चा यशस्वी केला. करोनाच्या संकटकाळातही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठे कार्य केले. अलिबागमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात सुसज्ज करोना सेंटर, ऍम्ब्युलन्स सारख्या सुविधा तसेच ऑक्सिजन प्लांटसाठी सीएसआर फंड उभारणे, घरोघरी अन्नधान्य पोहोचवण्यासारखी कामे झाली. तरुणाला लाजवेल असा उत्साह, कणखर आवाज, संघर्ष करण्याची तयारी, बेडरपणा, विशिष्ट कार्यशैली व प्रसिद्धीवलयापासून दूर राहून आपले कार्य करत राहण्याची खुबी त्यांचे व्यक्तिमत्त्व विशेष बनवते. त्यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कामगार पक्ष राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून काम करत रहावा. आ. भाई जयंत पाटील यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सदिच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!   Facebook X-twitter Telegram Whatsapp फोन क्रमांक ०२२ २२६१४१५३ ईमेल पत्ता info@skekap.com आमच्याशी संपर्क साधा

कृषी संस्कृतीचा सण : नागपंचमी

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो कृषी संस्कृतीचा सण : नागपंचमी भाऊराव बेंडे नागपंचमी हा सबंध भारतामध्ये साजरा केला जाणारा अब्राह्मणी सन आहे. अब्राह्मणी सन असण्याचे कारण ज्या सन उत्सव, परंपरा यामध्ये कुठल्याही प्रकारचे शोषण होत नाही त्यासाठी कुठल्याही पूरोहिताची मध्यस्थी लागत नाही, ते कृषी संस्कृतीशी नाते सांगतात ते सर्व अब्राह्मणी. या सणाचा भारतीय हिंदू समाजावर प्रचंड प्रभाव आहे त्यामुळे त्या सणाची दखल घेणे महत्वाचे आवश्यक आहे. नागपंचमी सणाचा भारतीय जनमानसावर असलेला प्रभाव: सबंध भारतामध्ये नागदेवतांची प्राचीन अशी मंदिरे अगदी जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहेत. भारतामध्ये क्वचितच असे एखादेच राज्य असेल की जिथे नाग मंदिरं नसतील. भारताच्या अति उत्तरेकडील उत्तराखंड राज्यांमध्ये असलेल्या पिथोरगढ जिल्ह्यामध्ये बेरीनाग या मंदिराचा इतिहास खूप प्राचीन आहे येथे आसलेल्या पहाडाची नावे धोलीनाग पहाड , नागेश्वर पहाड अशी नाग नावावरूनच आहेत. या पहडामध्ये आजही भुमिया ( नाग) देवाची पूजा केली जाते. येथील मंदिरांची नावे ही बेरिनाग मंदिर, धोलिनाग मंदिर, फेनीनाग मंदिर, पेनिनाग, कलिनाग,सुंदरी नाग मंदिर असेच आहेत. बिहारमधील बेगुसराय आणि samastipur जिल्यात जिवंत साप घेऊन जुलूस काढतात त्याच बरोबर तो मंसुरचक आणि आगापुर येथेही काढतात. इलाहाबाद मध्येही असेच गंगेच्या काठावर वासुकी नाग मंदिर आहे. तसेच त्याच तटावर तक्षकेश्वर नाग मंदिर आहे. मध्यप्रदेश मध्येही उज्जैन येथे असेच प्रसिद्ध नागचांद्रेश्वर मंदिर आहे.महाराष्ट्रामध्ये असलेल्या औढा नागनाथ मंदिर हे भारतातील प्रसिद्ध अश्या 12 ज्योति्लिंगांपैकी एक आहे. याच मंदिराच्या बाजूला आसपास नाग नावावरूनच गावे आहेत . वाराणाशिमध्येही नागमंदिर असून त्याच्या बाजूला नागकुप आहे. असेच जगातील सर्वात प्राचीन रहस्यमयी नागमंदिर हे केरळ मधील मन्नारसा येथे आहे. अश्या प्रकारे सबंध भारतामध्ये नागपंचमी नागदेवता यांचा प्रचंड प्रभाव आहे. अगदी भगवान शिव यांच्या गळ्यात आणि वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्याशीही नाग गण संबंधित आहेत. ते त्यांच्या शिल्पावरून दिसून येते. नाग पंचमीचे स्वरूप: नाग पंचमी सबंध भारतामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा सन आहे. भारतामध्ये राज्यस्थान, आसाम, बिहार, बंगाल, नागालँड, महाराष्ट्र, केरला, मनिपूर, मध्यप्रदेश आणि जवळपास सर्वच भारतामध्ये हा सण साजरा केला जातो.हा सण शुद्ध अब्राह्मणी आहे तो कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा आहे. शेतील सर्व महत्त्वाचे कामे ही उरकून झालेली असल्याने शेतात पीक हे लहा लाहा दिसत असल्याने हा सण तसा हर्ष आणि उल्हासाचा सन . लग्न करून गेलेल्या बायका या सणाला पहिल्यांदा माहेरी येतात. त्यांच्यासाठी हा सण विशेष ओढीचा आहे. या सनाविषयी एक असेही मत आहे की हा नाग , सर्प हे शेतीची नासधूस करणारे उंदीर संपवतात आणि शेतीचे रक्षण करतात म्हणून त्यांच्या प्रती पूज्यभाव व्यक्त करण्यासाठी ही साजरा केला जातो. या सणाचे स्वरूप : 1] या दिवशी चिरणे, कापणे, तळणे, चुलीवर तवा ठेवणे, त्याच बरोबर नागर चालवणे, आणि जमीन खानने निषिद्ध आहे. 2] या दिवशी स्त्रिया ह्या भावासाठी आयुष्य मिळावे म्हणून उपवास धरतात. 3] या दिवशी चिखलाचे नाग बनवून त्याच्या प्रतिकाची पूजा केली जाते. 4] या दिवशी पाटावर रक्त चांदणे किंवा हळदीने नऊ नाग तर कुठेकुठे पंच नाग काढले जातात. 5] या दिवशी फक्त स्त्रियांचं या नागाची किंवा त्या प्रतीक पूजा करतात हा सण मुख्यतः स्त्रियाच साजरा करतात. 6] या दिवशी झाडाला झोके बांधून तो खेळून हा सण उत्साहाने साजरा केला जातो. नाग पंचमीचा मिथक् आणि त्याची उकल. नागपंचमी विषयी भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळे मिथक आहेत. नाग गणाविषयी: नाग हे कुणी सरपटणारे प्राणी नव्हते तर ते एक मानवी गण होते त्यांच्या गणाचे गण चिन्ह हे नाग होते त्यावरून तो नाग गण म्हणून ओळखला गेला. एकंदरीत नागाविषयी सांगायचे झाले तर अगदी स्त्रीसत्तेपासून ते रामायण, महाभारत आणि तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत त्यांनी स्वतःचा गण टिकून ठेवला होता त्यानंतर तो जातिव्यवस्थेत विभागला गेला मात्र काही आदिवासी समुहनी त्यांनी ही ओळख आतापर्यंत अशीच टिकून ठेवली आहे त्याचाच परिणीती हे नागांच्या नावाने नागालँड ( नाग भूमी) हे राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या गणाची ओळख ही उत्तर भारतातील आसाम, मिझोराम, मणिपूर, नागालँड या आदिवासी जमातींत जपून ठेवली आहे याचे महत्त्वाचे कारण हे त्यांच्यात जाती व्यवस्था नसणे हे आहे. उर्वरित भारतात मात्र ह्या गणाचे लोक इतर जातीत मिसळून गेले आहेत मात्र त्यांची नागगणाची त्या गण चिन्हांची नेणीव अजूनही टिकून आहे त्यामुळेच ते प्रतीकात्मक रुपात नागपंचमी साजरी करतात. ज्या पंच नागाची पूजा केली जाते त्यापैकी अनंतनाग( शेष) ज्याच्या की नावाने जम्मू आणि काश्मीर मध्ये अनंतनाग नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे तक्षक याही नागाच्या नावाने पाकिस्तानमध्ये तक्षशिला नावाचा जिल्हा आहे. त्यानंतर वासुकी,पद्मनाभ नाग, कालिया हे येतात. आणखीही येरावत, कर्कोटक, धृतराष्ट्र ह्याही नागांचा उलेख आढळतो. भारतातील नागालँड आणि विदर्भातील नागपूर हे नागांच्या इतिहासाचे खूप महत्वाचे असे ठिकाणे आहेत. नागपुर हा जिल्हा नाग नदी, बाजूला नाग टेकडी असलेला आहे. संपूर्ण विदर्भाला नागविदर्भ म्हणून ओळखले जाते.मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ येथे नाग नाथाचे भारतातील आठवे ज्योतिर्लिंग आहे. मध्यप्रदेश येथे विदिशावर शेष, भोगिन, सदाचद्र, भूतनंदी, शिशूनंदि, यशनंदि या नाग राज्यांनी राज्य केल्याचा उलेख हा पुराणात आधलून येतो. पुराणातील आणखी एका उल्लेखामुळे नागानी मथुरा, विदेशा, कांतीपुरी आणि पद्मावती येथे राज्य केल्याचा उलेख आहे. नागपंचमी आणि या सणाचे स्त्रीसत्तेशी असलेले आदीबंध. भारतातील बहुतेक अभ्यासक हे नागवंशी हीच caonsept वापरतात मात्र जगाचा विचार केला सर्व मानव हे मुख्य तीन वंशात म्हणजे निग्रो इड, कोकेसाईड आणि मंगोलॉईड या वंशात सामावलेले आहेत . याचे अजून काही उपवंश देखील आहेत मात्र त्यात नागवंशाचा उल्लेख नाहीये. याचाच अर्थ नाग हा वंश नसून तो गण आहे. मुळात गनाचि निर्मिती ही. ही स्त्रीचं तिच्या नावाने करू शकते हे केव्हा शक्य होते तर शेतीतील वरकड उत्पादनाने शक्य होते आणि वरकड उत्पादन गनाचि राष्ट्री कृषी मायेमुळेच घेऊ शकते. या नाग गणाचि कुणी तरी राष्ट्री असली पाहिजे. तर पुराणामध्ये कृदू ही ब्राम्हण कष्यापाची पत्नी नागमाता म्हणून दाखवली आहे.मात्र इतर कुठेही तिचा उलेख किंवा शिल्प आधळून येत नाही. मात्र एवढ्यावरच ती नाग गनाचि आद्य राष्ट्री होत नाही. त्यासाठी संशोधनाची अत्यंत गरज आहे. कारण नाग गण आहे या अर्थी त्या गणाची आद्य राष्ट्री नक्कीच असली पाहिजे. आणि ती आपल्या गण सभासदांना अभिक्तजलसिंचन विधीच्या माध्यमातून गण सदस्य करून घेत असेल त्यासाठी गणाची पुषकरणी ( great bath) आवश्यक असते. अशीच एक पुषकरणी ही काशिमध्ये आहे त्यास नागकुप ( नागाची विहीर) म्हंटले जाते .ती नीश्चीतच नाग गणाची पूषकरणी असली पाहिजे आणि तिथे नाग गणाचे राज्य असेल पाहिजे. केवळ एका पुराव्यावरून ही भक्कमपणे सांगणे योग्य नाही त्यासाठी आपल्याला आणखी पुरावे पाहिजेत जे की नाग गण हा स्त्रीसत्ताक गण होता आणि त्या गाणाची निर्मिती ही स्त्री सत्तेच्या राष्ट्रीय ने केली होती. हे सिद्ध करू शकतील. असाच एक पुरावा आपल्याला केरळ मध्ये सापडतो जिथे की स्त्रीसत्तेचा दीर्घ वारसा लाभला आहे. या केरळमध्ये मन्ना रसा हे केरळमधील सर्वात प्राचीन मंदिर नाग राजाचे आहे. या