Skip to main content

Shekap

भांडवलशाहीच्या उन्मत्त गजराजाला काबूत ठेवू पाहणारा माहूत : कार्ल मार्क्स

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो भांडवलशाहीच्या उन्मत्त गजराजाला काबूत ठेवू पाहणारा माहूत : कार्ल मार्क्स आईन्स्टाईनचा E=mc2 हा सापेक्षता सिद्धांत जसा कुठल्याही परिस्थितीत भौतिकशास्त्रातून आपणाला खोडता येणार नाही, त्याच प्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, साहित्य, कला ह्या सर्वातून कार्ल मार्क्सला आपण खोडू शकणार नाही. त्याने दिलेल्या मूलभूत सिद्धांतांचा आत्ताच्या परिस्थितीमधील संदर्भ शोधून मानवी जीवनाच्या सुधारणांसाठी वापर करणं अपरिहार्य आहे, पुढे होईल. तुम्ही पुरोगामी असा, मूलतत्त्ववादी असा, राष्ट्रवादी असा, धर्मवादी असा, समाजवादी असा, भांडवलदारी असा कुणीही असाल राजकीय, आर्थिक, सामाजिक धोरण राबवताना तुम्हाला मार्क्सचा विचार करणं भाग पडेल. तशी चिन्हं आता स्पष्टपणे जगभरात दिसून येत आहेत. प्रत्यक्ष मार्क्सवाद आणि भारतातील मार्क्सवादी साम्यवादाचं स्वरूप, कार्यपद्धती हे एक संपूर्ण स्वतंत्र प्रकरण आहे. भारतात मार्क्सवाद रुजू शकत नाही असा एक अपप्रचार नेहमी केला जातो. वरील विधान पन्नास पंचाहत्तर वर्षांपूर्वी कदाचित योग्य वाटलं असतं. परंतु आजच्या सांप्रदायिक भांडवलशाहीच्या उन्मादिक काळात मार्क्सचा विचार न करणं हे स्वतः वर संकट ओढवून घेतल्यासारखं आहे. मार्क्सवाद म्हणजे काय? मार्क्सवाद……. मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय आहे? हा प्रश्न ज्यांना पडायला पाहिजे तो नव मध्यमवर्ग भांडवलशाहीने निर्माण केलेल्या चंगळवादात मशगुल आहे. मी ज्याला नवमध्यम वर्ग म्हणतोय तो खरंतर कनिष्ठ मध्यमवर्ग आहे. खाजगी बँकातील कर्मचारी, आयटी सेक्टर मधील इंजिनिअर्स, कॉर्पोरेट एम्प्लॉईज हे सर्व ह्या नवकनिष्ठ मध्यमवर्गात समाविष्ट आहेत. कॉर्पोरेट भांडवलदारानी वरील सर्व घटकांची संघटीत होण्याची, संघर्ष करण्याची शक्तीच काढून घेतली आहे. त्यासाठीच सद्याच्या सत्ताधारी राज्यकर्त्यांचा आणि भांडवलदारांचा खाजगीकरणावर जोर आहे. ह्या नवकनिष्ठ मध्यमवर्गाचा शक्तीपात त्यांना मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराने केला आहे. आपण ज्याला सर्वहारा वर्ग म्हणतो असा शारीरिक कष्ट करणारा शेतकरी, औद्योगिक कामगार, साफसफाई करणारे, वेठबिगारी ह्यांचं शोषण सुरू आहेच. परंतु ह्या नवकनिष्ठ मध्यमवर्गाचं सुद्धा शोषण सुरू आहे. हा वर्ग बूर्ज्वा (नवश्रीमंत वर्ग) होण्याचं स्वप्न पाहू लागला आहे. ह्या वर्गालाच मार्क्सची ओळख होणे महत्वाचं आणि गरजेचं आहे. भांडवलशाही मध्यमवर्गासमोर आर्थिक सुबत्तेचं, आर्थिक सुलभीकरणाचं एक आकर्षक चित्र उभा करत आहे. पण ते फसवं आहे. असं म्हणता येईल की शोषणाची पद्धत बदलली आहे. अलिकडे आपण नेहमी ऐकतो की समाज बदलला आहे, नात्यांपेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे वगैरे वगैरे. मार्क्सने ह्या गोष्टींची पाऊणे दोनशे वर्षांपूर्वी योग्य मीमांसा केली आहे. तो लिहितो, ‘ समाजात निर्माण होणारी नवी आर्थिक परिस्थितीनात्यांचं भावनिक स्वरूप बदलून आर्थिक नातेसंबंधात परावर्तित होते.’ खेड्यातून शहराकडे, शहरातून मेट्रोज् कडे, मेट्रोज् मधून ॲबरॉडकडे सरकणारा तरुण वर्ग कुटुंबापासून कसा दूर होत चालला आहे, हे गेल्या वीस वर्षातील चित्र आपण अनुभवतोय. मार्क्सची निरिक्षणं, तार्किक विचार, जीवनाशी निगडित सर्व क्षेत्रांचं सूक्ष्म विश्लेषण, त्यावर आधारित सिद्धांत, निष्कर्ष हे आजही लागू होतात. सवाल असा निर्माण होतो की त्याचं नेमकं म्हणनं काय आहे? त्याला काय पाहिजे? थोडक्यात सांगायचं झालं तर मार्क्सला सर्वहारा, कामगार, शेतकरी,. शोषित, पिडीत, कनिष्ठ मध्यमवर्गाची मुक्ती (emancipation) हवी आहे. त्यासाठी त्यानं अंगठा बाद होवू पर्यंत लिहिलं आहे. ह्या लिखाणासाठी, त्याच्या संघर्षासाठी त्याला त्याच्या जीवाभावाच्या मित्रानं म्हणजे फ्रेडरिक एंजेल्सनी मार्क्सच्या मरणापर्यंत आणि मरणोत्तर ही अखंड साथ दिली. म्हणूनच जगभरात बऱ्याच ठिकाणी दोघांचे एकत्र पुतळे आहेत. साम्यवाद्यांचा जाहीरनामा कामगार , सर्वहारा आणि एकूणच मानवाला शोषण, अन्यायाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ह्या दोघांनी लिहिलेल्या The Communist Manifesto म्हणजे साम्यवाद्यांचा जाहीरनाम्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मी सद्या हा मॅनिफेस्टो वाचतोय. माझ्या सवयीप्रमाणे महत्वाच्या मुद्द्यांना पेन्सिलने अंडरलाईन, ब्रॅकेट करु लागलो तर प्रत्येक पानावरील वाक्यनवाक्य अंडरलाईन होत चाललं आहे. ही गोष्ट मी जेष्ठ लेखक, विचारवंत जी.के. ऐनापुरे सरांशी शेअर केली. तर ते त्यांच्या खास शैलीत हसले. त्यांनी सांगितलं की ह्या निव्वळ ऐंशी पानांच्या जाहीरनाम्यावर जगभरात हजारो पुस्तक लिहिली गेली आहेत. त्यापैकी सद्या टेरी इगिल्टन आणि साल्वो जिझेक हे दोन तत्त्वज्ञ महत्वाचे मानले जातात. ह्या जाहीरनाम्याच्या मार्फतच त्यांनी कामगार वर्गाला भावनिक आव्हान केलं की, ‘ संघर्ष करा, आपणाकडे हरण्यासाठी ह्या साखळदंडा शिवाय दुसरे काहीही नाही.’ भौतिकवादी तत्त्वज्ञान मार्क्सने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात मोठी भर घातली ती गत्यात्मक किंवा द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद ह्या दोन संकल्पनांना जन्म देवून. ह्या अगोदरच्या भौतिकवादाचा संपूर्ण कायापालट ह्या नवीन संकल्पनेमूळे झाला. ह्याच संकल्पनेत संख्यात्मक बदलांकडून गुणात्मक बदलांकडे कसं जाता येईल ह्याचा उपाय ही मार्क्सने सांगितला आहे. भौतिकवादी तत्त्वज्ञान मांडताना त्याने धर्मचिकित्सा केली आणि ‘ धर्म हा लोकांसाठी अफूची गोळी आहे’ असं जाहीर केलं. अर्थशास्त्र मार्क्सने अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा दास कॅपिटल हा ग्रंथ लिहून एक नवीन क्रांती घडवून आणली. अर्थव्यवस्थेत भांडवल कसं निर्माण होतं? भांडवल ही नेमकी काय संकल्पना आहे? ह्याचं शास्त्रोक्त विश्लेषण त्यानं ह्या ग्रंथात केलं आहे. उत्पादन साधनं, श्रम, नफा, बाजारपेठ, मागणी-पुरवठा ह्या सर्व घटकांचा भांडवल निर्मिती मध्ये कसा उपयोग होतो, त्याची सूत्रं काय असतात, त्याचा शोषणाशी कसा संबंध असतो ह्याचं सुस्पष्ट विवेचन ह्या ग्रंथात मार्क्सने केले आहे. अमेरिका किंवा भांडवलशाहीचा स्वीकार केलेला कुठलाही देश जो पराकोटीचा मार्क्स विरोधी आहे. आर्थिक संकटात चोरुन का होईना दास कॅपिटल उघडतात. एक रिपोर्ट असा आहे की, अमेरिकेत मंदीच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना तिथला तरुण वर्ग कम्युनिस्ट मॅनिफेस्टोकडे आकर्षित झाला. आपण पाहिलं कामगार, शेतकरी ह्या सर्वहारा वर्गासाठीचा कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असेल, जीवन विषयक तत्त्वज्ञानातील द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद ह्या दोन संकल्पना असतील, अर्थशास्त्रातील भांडवल संकल्पनेविषयी विचार असतील मार्क्सने विपुल लिखाण केले आहे. ह्याबरोबरच एंजेल्ससोबत ‘ साहित्य आणि कला’ क्षेत्रावर प्रकाश टाकला आहे.साहित्य आणि कला क्षेत्रातील सौंदर्य तत्त्वाची नव्याने मांडणी केली आहे. साहित्यिक मूल्यांना नवा अर्थ प्राप्त करुन देणारे सिद्धांत मांडले आहेत. युरोपात मार्क्स अगोदरही मोठी तत्त्वज्ञानाची , चिंतनाची परंपरा होती. मग मार्क्सच जगभर का विस्तारला? ह्याचं कारण त्यानं आपल्या तत्त्वज्ञानाला सैद्धांतिक पातळीवर न ठेवता त्या तत्त्वज्ञानाला कृतिशीलतेची जोड दिली. ह्या दोघांनी जगभरातील कामगारांना संघटीत व्हायचं आव्हान केलं. त्यांच्या समोर ‘राजकीय सत्तेचं महास्वप्न’ ठेवलं. त्यांना जाग आणली. जवाहरलाल नेहरूंनीत्यांच्या ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ह्या पुस्तकात मार्क्सबद्दल एक मार्मिक निरिक्षण नोंदवून ठेवलं आहे. ते म्हणतात ‘कार्ल मार्क्स हा काही निव्वळ तात्विक सिद्धांताची बौद्धिक चर्चा करणारा कुणी गूढवादी तत्त्वज्ञ किंवा प्राध्यापक नव्हता. तो तत्वज्ञ तर होताच पण व्यवहार कुशल कार्यकर्तासुद्धा होता. त्याची विशेष पद्धती म्हणजे शास्त्रीय संशोधनाचे तंत्र राजकीय आर्थिक प्रश्नांचा विचार करतानाही उपयोगात आणायचे आणि जगातील दुःखावर त्या रीतीने उपाय शोधून काढावयाचे.’ नेहरूंच्या ह्या उद् गारांबरोबर डॉ. आंबेडकरांचा मार्क्स विषयीचा दृष्टीकोण पाहणं हे ही खूप महत्वाचे आहे. आंबेडकरांचा मार्क्सच्या काही मूलभूत विचारांना तत्वतः हा विरोध होता पण आंबेडकरांना मार्क्स मान्य नव्हता किंवा त्यांनी मार्क्स खोडून काढला हा अपप्रचार धादांत खोटा आहे. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेनी आपल्या मार्क्स आणि आंबेडकर या ग्रंथात उपरोक्त विचार अतिशय समर्पक रीतीने मांडला आहे. आंबेडकरांनी म्हटलं आहे की गौतम बुद्धाची या जगाच्या पाठीवर जर कुणाशी तुलना होऊ शकत असेल तर फक्त कार्ल मार्क्सशी ! हे विधान करताना आंबेडकरांनी कोणताही आतातायीपणा, अतिशयोक्ती केलेली नाही हे खरं. या दोघांचाही भर सैद्धांतिक तत्त्वज्ञानाच्या मांडणी बरोबरच प्रत्यक्ष कृतीवर

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो

शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो शहीद अर्नेस्टो चे गव्हेरा : तरुणांच्या मनातील जागतिक क्रांतिकारी हिरो “जगातील डाव्या, पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचा आयकॉन. जन्म अर्जेंटिनातला, संपूर्ण दक्षिण अमेरिका खंड मोटारसायकल वरून फिरणारा, क्युबन क्रांतीचा एक महत्त्वाचा नायक, त्यानंतर बोलिव्हियामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करणारा एक खराखुरा क्रांतिकारक. जगात जिथे जिथे अन्याय होईल, तिथे तिथे जाऊन लढण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारे कॉम्रेड अर्नेस्टो चे गव्हेरा नक्कीच सर्व देशांच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवरील तमाम तरुणांचा आदर्श बनण्यावाचून कसा राहील. अर्नेस्टो चे गव्हेरा हे क्युबन क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाचे पुढारी, लढाऊ सेनापती, खुपच प्रभावी क्रांतिकारक होते. कारण ते जन्मले अर्जेंटिनामध्ये, क्रांतिकार्य केले क्युबात आणि तेच कार्य करताना शहीद झाले बोलिव्हियात. म्हणूनच तर ‘चे’ यांच्याबद्दल जागतिक पातळीवर एक वेगळेच आकर्षण आहे. १४ जून, १९२८ रोजी अर्जेंटिनामधील रोसरिओ येथे ‘चे’ यांचा जन्म झाला. ‘चे’ हे आपले वैद्यकीय शिक्षण सुरू असताना डिसेंबर १९५१ मध्ये अल्बर्टो या मित्रासोबत मोटारसायकलवरून दक्षिण अमेरिका खंड फिरायला गेले. चिली, पेरु, लटेशिया, कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, अर्जेंटिना या देशात फिरले. आगस्ट १९५२ मध्ये ‘चे’ परतले आणि जोरदार अभ्यास करून मार्च १९५३ मध्ये डॉक्टर बनले. त्यानंतर करकास येथील कुष्ठधाम ‘चे’ यांना ८०० डॉलर्स महिना पगारावर नोकरी द्यायला तयार होते. परंतु ‘चे’ यांनी तसे केले नाही. ‘चे’ यांनी शिक्षण घेतानाच मार्क्सवादी पुस्तके वाचली होती. दक्षिण अमेरिकेतील प्रवासात त्यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचे भयानक दारिद्र्य व मागासलेपणा अगदी जवळून अनुभवले होते. या सर्व परिस्थितीला परदेशी मक्तेदार, अमेरिकन साम्राज्यवाद कारणीभूत आहे. हे त्यांना स्पष्ट झाले होते. गुलामीच्या बेड्या उखडून टाकण्यासाठी, साम्राज्यवादाला पराभूत करून पिचलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे केवळ क्रांती.’चे’ यांना हे स्पष्ट समजले होते. वंचितांना खरे जीवन मिळवून देणे, मानवी कल्याणासाठी कार्य करणे हे एक जगप्रसिद्ध संशोधक किंवा विख्यात डॉक्टर बनणे यापेक्षा किंचितही कमी नाही. याबद्दल ‘चे’ यांच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. शिक्षण संपल्यावर ‘चे’ यांनी काही दिवस बोलिव्हिया आणि ग्वाटेमाला देशात कार्य केले. हे कार्य सुरू असतानाच जून १९५५ मध्ये ‘चे’ यांची राउल कास्ट्रो यांच्याशी भेट झाली. याच दरम्यान फिडेल कास्ट्रो अमेरिकेत आपल्या क्युबन देशबांधवांकडून क्रांतिकार्यासाठी मदत जमा करीत होते. जुलै १९५५ मध्ये मेक्सिकोत फिडेल कास्ट्रो यांच्याशी ‘चे’ यांची भेट राउल कास्ट्रो यांनी करून दिली. त्यांच्यात आगामी योजनांची व राजकीय विषयांवर चर्चा झाली. मदत जमा केल्यानंतर नोव्हेंबर १९५६ मध्ये ‘ग्रान्मा’ने क्रांतिकारक क्युबाकडे रवाना झाले. त्या बोटीची क्षमता केवळ १२ होती, त्यात ८० पेक्षा अधिक माणसं बसली होती. बोटीला क्युबाच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. प्रवासात असताना अचानक बोटीत पाणी शिरले. क्रांतिकारकांना खूप कमी अन्नावर जगावे लागले. एकावेळी तर सडकी संत्री केवळ शिल्लक राहिली होती. त्याचवेळी ‘चे’ यांच्या दम्याच्या आजाराने जोर धरला होता. तरी देखील तशाही परिस्थितीत ‘चे’ क्रांतिकारकांमध्ये उत्साह वाढवित होते. बोट अचानकच किनाऱ्यापासून काही अंतरावरच थांबली. क्रांतिकारकांना पुरेशी हत्यारं आणि थोडेसे अन्न याशिवाय गळ्यापर्यंत पाण्यातून जाताना काही सोबत घेता आले नाही. ‘ग्रान्मा’ असताना हुकुमशाह बटिस्टाच्या विमानांनी तिला हेरले होते. पाण्यातून मार्ग काढताना क्रांतिकारकांवर गोळीबार सुरू झाला. क्रांतिकारक विमानांना चुकवत पुढे सरकत होते. त्यादिवशी संपूर्ण रात्र क्रांतिकारकांना ऊसाच्या मळ्यातून चालावे लागले होते. ऊस खाऊन ते भूक मिटवत होते. एका कारखान्याच्या परिसरात क्रांतिकारक विश्रांती करतानाच त्यांच्यावर पुन्हा गोळीबार सुरू झाला. बराच वेळ चकमक उडाली. आडोसा घेण्यासाठी ‘चे’सह क्रांतिकारक ऊसाच्या मळ्यात शिरले. विमाने गेल्यानंतर क्रांतिकारक पुढे सरकले आणि मागे वळून पाहिले तर त्याच ऊसाच्या मळ्याला आगीने घेरले होते. त्यानंतर अनेक लढाया झाल्या. त्या प्रत्येक लढाईमध्ये ‘चे’ आघाडीवर असत. पहिल्याच लढाईत बटिस्टाच्या सैन्याचे क्रांतिकारकांनी पराभव केल्याने ते पार खचून गेले होते. क्युबातील सिएरा मिस्रा डोंगर परिसरात क्रांतिकारकांनी आपले तळ ठोकले होते. क्रांतिकारकांना गनिमी युद्ध व राजकीय शिक्षण देण्याची मुख्य जबाबदारी ‘चे’ यांच्याकडे होती. क्युबातील वेगवेगळ्या भागात असे ठिकाण क्रांतिकारकांनी बनवले होते. याचदरम्यान शेतकरी, शेतमजूर, कामगार यांचा पाठिंबा क्रांतिकारकांना मिळत होता. त्यांच्यातले काही जण प्रत्यक्ष लढ्यात सामील होत होते. जनतेने क्रांतिकारकांना अन्न पुरवूनही भरपूर मदत केली. १९५८ च्या आगस्टमध्ये फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा यांनी एक सार्वत्रिक योजना आखली. अर्थातच क्युबन कम्युनिस्ट पक्षही यामध्ये सामील होता. क्युबन जनता बटिस्टाच्या जुलुमाला प्रचंड कंटाळली होती. दडपशाही, भ्रष्टाचार, अराजक यांना पार कंटाळलेल्या जनतेमध्ये हुकुमशाह बटिस्टाविरोधी भयंकर चीड निर्माण झालेली होती. क्युबाला केवळ लुटण्याशिवाय बटिस्टाने काही केले नाही. अमेरिका हुकुमशाह बटिस्टाला पूर्ण सहकार्य करत होती. लढाईसाठी लागणारी सर्व हत्यारं, शस्त्रास्त्रे बटिस्टाकडे होती, परंतु ती कुशलपणे वापरणाऱ्यांचा अभाव होता. १९५८ आगस्टच्या शेवटी लढाईच्या सर्व सूचना क्रांतिकारकांना देण्यात आल्या. फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो व इतर नेत्यांच्या नेतृत्त्वात क्युबातील विविध भागात प्रत्यक्ष लढाई करायला क्रांतिकारक पूर्णपणे तयार होते. सर्व नियोजन झाल्यानंतर क्रांतिकारकांनी क्युबातील अनेक ठिकाणी लढाया करून त्या त्या भागावर ताबा मिळवला. लढाई जिंकत जिंकत क्रांतिकारक हवानाकडे जात होते. त्याचवेळी जनतेने बटिस्टा सरकारला कर भरणे बंद केले. कामगार संपावर गेले. फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो व इतर सर्वच क्रांतिकारकांचे जनता तुफानी स्वागत करत होती. त्यांचा जयजयकार करून क्रांतीला समर्थन दर्शवत होती. परिस्थिती क्रांतिकारकांसाठी अनुकूल बनत होती. काही ठिकाणी तर बटिस्टाचे सैन्य लढाई सुरू होण्याआधीच शरण आले. बरीच शहरे, गावं विविध ठिकाणी क्रांतिकारकांनी ताब्यात घेतले. क्रांतिकारकांनी बटिस्टाची हजारो सैन्य, मशीनगन्स, लढाऊ विमान, दारूगोळा आणि महत्त्वाचे अधिकारी कैद केले होते. आता जे अधिकारी आणि सैन्य बटिस्टाकडे होते, त्यांचा तर फिडेल कास्ट्रो आणि चे गव्हेरा यांचे फक्त नाव जरी ऐकले तरी थरकाप उडत होता. त्यामुळे शेवटी – शेवटी तर बटिस्टाच्या सैन्यात बटिस्टासाठी लढण्याची इच्छाच उरली नव्हती. १९५८ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी क्रांतिकारकांना अनेकदा संघर्ष करावा लागला. सर्व लढाया क्रांतिकारक जिंकत होते. क्रांतिकारकांना अंतिम विजय प्राप्त होण्याआधीच ३१ डिसेंबर १९५८ च्या रात्री हुकुमशाह बटिस्टा क्युबा सोडून पळून गेला. पराभव जवळच दिसल्याने त्याने आपले सामान गुंडाळले. ही बातमी वाऱ्यासारखी क्युबात पसरली. बटिस्टाचे उर्वरित अधिकारी आणि सैन्य यांना आता शरण पत्करल्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग उरला नव्हता, झाले देखील तसेच. १९५९ च्या नववर्षाने क्युबन क्रांतीचे जंगी स्वागत झाले. क्रातीचे नेते फिडेल कास्ट्रो, चे गव्हेरा, राउल कास्ट्रो आणि त्यांचे सर्व क्रांतिकारक सहकारी यांचे सर्व जनतेने अभिनंदन केले. क्रांती यशस्वी झाली. क्रांतीनंतर फिडेल कास्ट्रो हे क्युबाचे राष्ट्राध्यक्ष बनले तर चे गव्हेरा यांच्याकडे संरक्षण, लष्कर, अर्थ, उद्योग ही खाती तसेच क्युबन राष्ट्रीय बँकेचे संचालक, आर्थिक सल्लागार, नियोजन मंडळ या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. चे गव्हेरा हे क्युबन कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळातही होते. क्रांती झाली तेंव्हा ‘चे’ यांचे वय केवळ ३० वर्षे तर फिडेल कास्ट्रो हे ३२ वर्षांचे तरूण होते. क्रांतीनंतरही ‘चे’ यांच्यात असलेली क्रांतिकारक ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. क्युबन क्रांतीने संपूर्ण दक्षिण अमेरिकेत एक नवचैतन्य निर्माण केले होते. १९६५ मध्ये ‘चे’ यांनी क्युबा सोडला. तेथून गेल्यावर सुरूवातीला कांगो देशात कार्य केले. त्यानंतर बोलिव्हियामध्ये अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने गेले. बोलिव्हियामध्ये ‘चे’